स्टिंग ऑपरेशन न्यूज/
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्य श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वरोरा शाखेच्या वतीने दिनांक २६ एप्रिल रोजी वरोरा येथे स्व.दादासाहेब देवतळे सभागृहात सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पत संस्थेचे अध्यक्ष अँड देविदासजी काळे होते तर उद्घाटक म्हणुन कवडुजी नगराळे उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र अकोला हे होते.
व्यासपीठावर विवेकानंद मांडवकर उपाध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, संजय दोरखंडे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व संचालक मंडळ उपस्थीत होते.
सभासद हा संस्थेचा मालक आहे परंतु सभासदाने घेतलेले कर्ज नियमीत फेडण्याचे कर्तव्य आहे सभासदांचे कर्तव्य सुध्दा महत्वाचे आहे. रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे कार्य प्रशंसनीय असून संस्थेचे ध्येय धोरण चालविण्याचे काम संचालक मंडळाचे आहे. अध्यक्षीय भाषणात अँड काळे म्हणाले की ८७०७५ इतकी सभासद संख्या असुन ८१८-९६ कोटी रुपयाच्या ठेवी आहे. संस्थेने ४७७ कोटी रूपयाचे कर्ज वाटप केले असुन २ करोड ९७ लाख रुपयाचा नफा संस्थेला आला. सध्यस्थितीत एकुण २२ शाखा सुरु आहे.
या मेळाव्यात संस्थेचे उत्कृष्ठ ठेविदार, उत्कृष्ठ कर्जदार, उत्कृष्ठ कर्मचारी, व उत्कृष्ठ दैनिक अभिकर्ता आणि संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदान बद्दल सत्कारमूर्ती यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन पायल परांडे तर आभार प्रदर्शन बरडे यांनी केले.