'अती डिड शहाने' हास्य कवी संमेलनात वणीकर लोटपोट

वणी /

दरवषी प्रमाने ह्याही वर्षी धुलीवंदनाच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता अखील भारतीय अती दिडशहाणे संमेलन समिती च्या वतीने हास्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
      शहरातील व परीसरातील नागरिकांचे मनोरंजन व्हावे त्यांचा त्या दिनी थकवा दूर व्हावा ह्या दृष्टिकोनातून दरवर्षीच अनेक दिग्गज सीनेस्टार कवी वणी शहरात दाखल होतात त्याचे कौशल्य अनेकांना बघता यावे त्या करीता अखील भारतीय अती दिड शहाणे समिती दरवर्षीच हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात तत्पर असते.

ह्यावर्षीच्या हास्य कवी समेलनात विनोद सोनी हास्य कवि मुंबई, रश्मि किरण गीत, गजल जबलपूर, राजेंद्र मालविया आलसी कवी,लाफ्टर किंग ज्युनिअर.जानी लिवर फिल्म स्टार,मुजावर मालेगावी आणि हास्य कवी तथा प्रसिद्ध निवेदक किरण जोशी याच्यासह अनेकांनी हास्येमय किस्से सांगून तसेच शेरोशायरीने त्यांच्या स्वररचित विनोदी हास्य व्यंग कवीतेने प्रेषकाचे लक्ष वेधून प्रेषकांना लोटपोट केले

विविध घटकांवर कवीने प्रकाश टाकत जनतेचे प्रबोधन केले तसेच छावा चित्रपटाची प्रशंसा करत हा चित्रपट बघण्याची अपेक्षा ज्युनियर जाॅनी लिवर यांनी वर्तवली.

 राजकीय नेते व सिने सुष्टीतील कलाकार व तसेच विविध आवाजाची नक्कल करत ज्युनियर जाॅनी लिवर यांनी प्रेषकांची दाद मिळवली! वन्स मोर करत ज्युनियर जाॅनी लिवरच्या कौशल्याने या हास्य कवी समेलनाला खरी रंगत आली हे विशेष.

 या हास्य कवी समेलनात निमंत्रीत कवी कलावंताचा तसेच राजकीय प्रशासकीय अधिकारी नेते मंडळी आणि आयोजनाला बळकटी देणाऱ्यांचा ह्या वेळेस सत्कार करण्यात आला
 वणी व परीसरातील हजारोच्यावर वर प्रेषकाची या कवी समेलनात उपस्थिती होती
या आयोजित हास्य कवी समेलनासाठी राजुभाऊ उंबरकर, रवि बेलुरकर, राजाभाऊ पाथ्रटकर,राकेश खुराणा, निकेत गुप्त, आशिष खुलसंगे, प्रदिप बोनगिरवार, सुभाष तिवारी, बंटी खुराणा,दिपक छाजेड, तुषार अतकरे,भिकमचंद गोयंका, रमेश तांबे. इत्यादीच्या अथक परिश्रमात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Post a Comment

Previous Post Next Post