अनिकेत व समीक्षा आमटे ' शिक्षणव्रती ' पुरस्काराचे मानकरी

वणी /

अतिशय दुर्गम भागात अबोलपणे अजोड शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनिकेत प्रकाश आमटे व समीक्षा अनिकेत आमटे यांचा गौरव त्यांना ' शिक्षणव्रती ' पुरस्कार प्रदान करुन करण्याचा निर्णय जैताई देवस्थान शिक्षण समितीने घेतला असल्याचे समितीचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. पुरस्काराचे स्वरुप ११००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ आहे. या वर्षी विशेषे करुन हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून या पूर्वी हा पुरस्कार उत्कृष्ट अध्यापकाला * प्राचार्य राम शेवाळकर स्मृति उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार ' या नावाने देण्यात येत होता. या वर्षी हा पुरस्कार ' प्राचार्य राम शेवाळकर स्मृति शिक्षणव्रती' पुरस्कार या उपाधीने विशेष बाब म्हणून दिला जाणार आहे. दर वर्षी हा पुरस्कार पू.मामा क्षीरसागर स्मृतिदिनानिमित्त ६ एप्रिलला प्रदान करण्यात येतो.
परंतु या वर्षी ६ एप्रिलला रामनवमी असल्याने हा
पुरस्कार दि.५ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ संपादक देवेंद्र 
गावंडे यांच्या हस्ते आमटे दांपत्याला प्रदान करण्यात येणार आहे.
अनिकेत गेल्या २१/वर्षांपासून तर समीक्षा गेल्या १७ वर्षांपासून हेमालकसा येथील आश्रम शाळेला व १० वर्षां पासून नेलगुंडा येथील साधना विद्यालयाला आदर्श शाळा म्हणून आकार देण्यात यशस्वी झाले आहेत हे उल्लेखनीय.

Post a Comment

Previous Post Next Post