अ.भा. अती दिड शहाणे समितीच्या वतीने हास्य कवी संमेलनाचे आयोजन

वणी /

वणी शहरात २५ वर्षांपासून धुलीवंदनाच्या दिवशी संध्याकाळी अ.भा.अती दिडशहाणे संमेलन समितीच्या वतीने हास्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी १४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता धुलिवंदणाचे दिवशी शासकीय मैदान (पाण्याचे टॉकी जवळ) वणी, येथे शहरातील नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक दिग्गज सीनेस्टार कवी आपल्या वणी शहरात येत आहे.
त्यामध्ये विनोद सोनी हास्य कवि मुंबई, रश्मि किरण गीत, गजल जबलपूर, राजेंद्र मालविया आलसी कवी,लाफ्टर किंग ज्यु.जानी लिवर एवं फिल्म स्टार,मुजावर मालेगावी मंच संचालक किरण जोशी हे कवी आपली कला सादर करण्यासाठी वणी येथे आयोजित संमेलनात सहभागी होणार आहेत.
आपल्याला खदखदून हसायला लावणार आहेत. तरी आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
आयोजक समितीचे सदस्य राजुभाऊ उंबरकर, रवि बेलुरकर,निकेत गुप्ता, राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, आशिष खुलसंगे, प्रदिप बोनगिरवार, सुभाष तिवारी, बंटी खुराणा,दिपक छाजेड, तुषार अतकरे,भिकमचंद गोयंका, रमेश तांबे. इत्यादी सदस्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post