वणी पोलीस स्टेशन येथील 123 बेवारस वाहनांचा मंगळवारी होणार लिलाव

वणी : 

 वणी पोलीस स्टेशन अंतर्गत सादर करण्यात आलेल्या यादीतील एकुण 126 बेवारस मोटार वाहनांचा उपविभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेश क्रमांकः महसूल सहायत/उपविभागीय दंडाधिकारी/गृहशाखा/2025 अन्वये पोलीस स्टेशन वणी येथे मंगळवारी दिनांक 25/03/2025 रोजी 12.00 वाजता पासुन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येत आहे.

वणी पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिनांक 25/03/2025 पुर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन वणी येथे वाहनाचे मूळ कागदोपत्री दस्तऐवजासह यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास बेवारस वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, तद्नंतर कोणतेही आक्षेप हरकत नोंद घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अशी माहिती पोलीस स्टेशन वणी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post