मानकी येथे युवकांचा भाजपात प्रवेश, बोदकुरवार यांना वाढता पाठिंबा...

वणी :
वणी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्येक गावात रस्ते, नाल्या, स्ट्रिट लाईट, वॉटर एटीएम अशा प्रकारे भक्कम कामांचा निधी दिला. भाजपच्या काळात जणू विकासाची गंगा गावागावात पोहोचली आहे त्यामुळेच त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळत असुन त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
शुक्रवारी मानकी येथे महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार हे गाव भेट दरम्यान गावात पोहोचताच गावकऱ्यांनी वाजत गाजत त्याचे स्वागत केले व त्यानंतर गावात पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर भाजपाचे उपाध्यक्ष नितीन वासेकर यांच्या नेतृत्वात युवकांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. 
यावेळी भाजपचे वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेडे, सरपंच कैलास पिपराडे, माजी सरपंच भवानी मांदाडे, महादेवराव चिडे, उमरीचे सरपंच तुकाराम माथणकर, आनंद काळे, राहुल कुत्तारमारे, प्रशांत भोज, विठ्ठल कोडापे, विठ्ठल, सरवर, विलास काकडे, प्रविण मिलमिले, मोहन खिरेकर, नंदु निकुडे, गजानन गारघाटे , प्रतिक चिरुले, सुजल वासेकर, विलास नागोसे, हर्षल मिलमीले, प्रदीप येरमे, अतुल वराटे, विनोद कनाके, मधुकर कनाके, प्रदीप येरमे, रमेश कनाके, शंकर आडे, अरुणा वासेकर, सविता पहापळे, प्रतिभा येरमे, विठ्ठल कनाके, जंगलु कनाके यांच्या सह समस्त गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post