वणी :
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी शिरपूर पोलिस प्रशासना सज्ज झाले आहे. त्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यानुषंगाने रविवारी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी शिरपूर पोलिस ठाणे हद्दीतील गावात मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढण्यात आला.
गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलिस अनेक उपाययोजना करत आहेत. संपूर्ण शिरपूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील शिरपूर, शिंदोला, कुरई, वेळाबाई, मोहदा, कायर, इत्यादी महत्त्वाच्या गावात पोलिसांनी रूट मार्च काढला.
यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी, 32 CISF जवान, 7 पोलिस अंमलदारांचा समावेश होता.
जातिय सामाजिक तेढ निर्माण केल्यास कारवाई
कोणतीही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जर कोणी सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर संपर्क साधावा - माधव शिंदे, ठाणेदार शिरपूर