नगर परिषद वणी अंतर्गत मतदान जनजागृती अभियान

वणी :

महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे यासाठी वणी नगर परिषद अंतर्गत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
पथनाट्यद्वारा मतदान जनजागृती करतांना

रविवारी दिनांक १० नोव्हेंबर ला शहरातील विविध ठिकाणी तसेच साई मंदीर चौक, टिळक चौक, गांधी चौक, सर्वोदय चौक, आंबेडकर चौक यासह इतर प्रमुख भागात पथनाट्य च्या माध्यमातून मतदान करण्यासाठी आव्हान करून जनजागृती करण्यात आली. 
मतदान हे लोकशाही साठी कसे महत्वाचे आहे हे नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. यासाठी वनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या मार्गदर्शाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 यामध्ये शहर अभियान व्यवस्थापक अँड पूर्णिमा शिरभाते, यांच्या नेतृत्त्वात क्रांतिज्योती शहर स्तर संघ वणी च्या उपाध्यक्ष मृणाली मस्के , सीआरपी रंजना भंडारवार , वर्षा लाकडे, तृप्ती माळीकर, शारदा किरण श्रीनाथ लोखंडे, ममता मेंगावार, शालू सहारे, मंजीत कौर, छाया जांभुळकर, वंदना काकडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post