दिवाळीनिमित्त कपडे व फराळाच्या पाकिटांचे वाटप, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

वणी :
दीपोत्सव हा सण आनंदाचा उत्साहाचा व चैतन्याचा असून या सणांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारातून कपडे ,फराळ व इतर साहित्य खरेदी करीत असतात परंतु गोरगरिबांना याच वस्तू खरेदी करताना हजारदा विचार करावा लागतो म्हणूनच लोकमान्य टिळक महाविद्यालय या सर्व गोरगरिब बांधवांचा विचार करून सामाजिक उपक्रम राबवित असते की ज्या उपक्रमामध्ये कपडे वाटप व फराळ वाटप यांचा समावेश असतो. 
लो.टी. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रविवार दिनांक 27/10/24 ला सकाळी 8 ते 10 या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये गोरगरिबांना दिवाळीनिमित्त 775 कपड्यांचे वाटप करण्यात आले व 200 फराळांच्या पॉकिटांचे वाटप आले.
 या कार्यक्रमाला वणीतील गणमान्य नागरिकांचे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा डॉ विकास जुनगरी व प्रा डॉ गणेश माघाडे तसेच प्रा नार्लावार सर, दिनकर उरकुडे, भदुसिंग वडते, विशाल कुबडे, संजू बिलोरिया तसेच बी ए भाग तीनचे विद्यार्थी अरमान अन्सारी, आझाद खान, निकिता निखाडे, कोमल जेनेकर, प्राची कुळसंगे , अमिषा भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post