देवीच्या गीतावरून नृत्य पाहून रसिक भारावले...


विजय चोरडिया यांनी कलावंतांचा केला सत्कार....


सर्वत्र नवरात्री उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते वणी शहरातील जैताई मंदिर येथे सोमवार दिनांक 7 ऑक्टोबरला सायंकाळी देवीच्या विविध गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. 

जैताई देवस्थानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अष्टकम, देवीचे, कोळीगीत गोंधळ सादर करण्यात आले असून शास्त्रीय नृत्य व लोक नृत्य द्वारे  विविध देवीचे रूप दाखवण्यात आले होते. 

शहरातील सागर झेप बहुउद्देशीय संस्था व संस्कार भारती समिती तर्फे सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य, प्रभावी व्यक्तिमत्व विजय चोरडिया यांनी सर्व नृत्य कलावंतांचा सत्कार केला व संपूर्ण कार्यक्रम पाहून वणी शहरात असे उत्कृष्ट कलावंत नृत्य सादर करतात याबाबत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले. 

सर्व नृत्याचे दिग्दर्शन प्रियंका कोटणाके यांनी केले असून जैताई देवस्थान व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. नरेंद्र नगरवाला याची 5 वर्षाची नात शांभवी ने रसिकांचे विशेष लक्ष वेधले होते. स्पृहा कोरडे, आरोही खैरे,गायत्री लुथडे, दृष्टी लुथडे, गौरव नायनवार, प्रियांशी, आरोही पंडलवार, स्वरा शेंडे, अदिती ढूमे, ओवि रोगे, स्वरा टेकाम, आराध्या भोसले, रिद्धी राऊत, सेजल यांनी नृत्य सादर केले. जैताई  मंदिरातील अन्नछत्र सेवा समिती व देवस्थानचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम पाहायला न मिळाल्याने खंत व्यक्त केली. नृत्याच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व कलावंत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post