वणीमध्ये महाविकास आघाडी चे संजय देरकर उमेदवार, आता, आ. बोदकुरवार, राजु उंबरकर व देरकर यांच्यात होणार रंगतदार लढत...

वणी :

जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विधानसभा मतदार संघ असलेल्या वणीमधून महाविकास आघाडीने बुधवारी सायंकाळी आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली. शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सुटेल, असा अंदाज वर्तविल्या जात असतांनाच शेवटी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने आघाडीत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली.

संजय देरकर यांनी या पुर्वी विधानसभेच्या निवडणुका लढल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी ते पराभुत झाले. यावेळी मात्र महाविकास आघाडीने त्यांच्या नावाला सर्व संमती दिली. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी खासदार श्रीमती धानोरकर या प्रयत्नरत होत्या. काँग्रेसकडून संजय खाडे, वामनराव कासावार व आशिष कुळसंगे हे इच्छूक होते. तर शिवसेनेकडून विश्वास नांदेकर, संजय निखाडे हे स्पर्धेत होते. मात्र शेवटी देरकर यांच्या नावावर मोहर उमटल्या गेली.

या मतदार संघात आता विद्यमान - आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजु उंबरकर, व शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांच्यात रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post