वणी ;
येथील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर प्राचार्य आर एल मोहिते यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सामूहिक प्रतिज्ञा व ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे पुस्तके विद्यार्थ्याना वितरीत करण्यात आले.
ग्रामगितेमध्ये मानवाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यक्त झालेली आहेत. मानवी जीवनाची सर्व मूल्य ग्रामगितेत सामावलेली असल्यामुळे नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनी त्यानुसार आचरण केल्यास स्वतःचे भवितव्य तो निश्चितच उज्वल करू शकतो. मात्र त्यासाठी नम्रता. कष्टाळूपणा यासारख्या गुणांना अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे असे मत ग्रामगिताचार्य वैजनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्र वंदनेनी कार्यक्रमांची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विकास बलकी, अजय बदखल, बाबाराव कुचनकर, गणपत ठाकरे, गजानन टेंबुर्डे, रविंद्र उलमाले, यशवंत भोयर, संध्या लोणारे, शैलजा झाडे, विद्या आत्राम, पुजा सेंगर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.