वणी :
संताजी एक शाखीय तेली समाजाचा कोजागिरी निमित्ताने पारिवारिक स्नेहमिलन सोहळा रवि बेलुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बाजोरिया लॉन वणी येथे संपन्न झाला. यावेळी समाजातील ज्येष्ठ मान्यवर तानाजी पाऊनकर , बाबाराव खांदनकर,माजी नगरसेवक संतोष डंभारे, गाताताई पिपराडे ,स्मिताताई डवरे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
आज आपला समाज एकत्र करून हे पारिवारिक संमेलन आयोजित केले. समाज बांधवंना यापुढे ही कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आणू अशी इच्छा अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी व्यक्त केली. यावेळी गाताताई पिपराडे व सीमाताई डवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात एकुण 145 परिवार सहकुटुंबा सहित 600 समाजबांधव उपस्थित होते. यावेळी परिवारचा परीचय घेण्यात आला महिलांसाठी व लाहणं मुलांना मनोरंजनासाठी गेम घेण्यात आले त्यामध्ये बक्षीस देण्यात आले व उत्साहात भर पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लिचोडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीताई पाटील तर आभारप्रदर्शन कैलास पिपराडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे संतोष डंभारे, विलास क्षिरसागर, विजय पिपराडे, गजानन पाटील, रविंद्र लिचोडे, पंढरीनाथ बोरपे, देवेंद्र गोबाडे, विशाल ठोंबरे,राजु पाटील, आशिष डंभारे, सचिन डवरे, अमन क्षिरसागर,यांनी मोलाचे सहकार्य केले.