वणी मतदारसंघात पहिल्‍या दिवशी एकही अर्ज दाखल नाही १४ जणांनी घेतले १९ अर्ज

वणी : 

वणी विधानसभा मतदार संघात पहिल्‍या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. पण १४ जणांनी १९ नामनिर्देशन पत्रे घेतली आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिली. 
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्‍यास आज दिनांक २२ ऑक्टोंबर पासून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० ऑक्‍टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर ४ नोंव्‍हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची अंतिम मुदत आहे. मतदान २० नोंव्‍हेबर रोजी होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशांचे पालन व्‍हावे. यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी. अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्‍या आहेत. 

१४ जणांनी घेतले १९ अर्ज 

पहिल्‍याच दिवशी १४ जणांना १९ अर्जांची विक्री झाली आहे मात्र आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही अशी माहिती मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post