वणी :
यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू असून, समितीचे सदस्य वणी येथे दाखल झाल्यानंतर आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरणताई देरकर यांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत करून सत्कार केला. या भेटीदरम्यान आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच परिसरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत समितीसमोर निवेदन साद केले. संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी विधिमंडळ अंदाज समितीचे आमदार अर्जुन खोतकर, आमदार दिलीप बोरसे, आमदार काशीराम पावरा आणि आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक गणपत लेडांगे, वणी शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर संघटक मनीष बत्रा, नगरसेवक सुधीर थेरे, नगरसेवक अजय ढोबे, नगरसेवक अनिकेत बदखल, नगरसेवक गुलाम रंगरेज, जगणं जुनघरी, अभय मुथा, सुमेर खान, महिला तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे आदी उपस्थित होते.