स्टिंग ऑपरेशन न्यूज/
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असून, ‘एक दिवा आशीर्वादाचा; विकसित भारताच्या संकल्पाचा’ हे विशेष अभियानही राबविण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला सन्मान देण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक बूथवरील घरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथवर १०० दिवे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘सेवा, समर्पण व राष्ट्रनिर्माण’ या भावनेतून देशाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सेवेला नमन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सेवेला साधना मानून राष्ट्रनिर्माणाला गती देण्याचा संकल्प या अभियानातून व्यक्त करण्यात येणार आहे.
विकसित भारताच्या संकल्पाला बळ देण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी दिवा प्रज्वलित करून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतिने करण्यात आले आहे.