आदर्श नागरी पतसंस्थेत आर्थिक नियोजन विषयावरील विशेष प्रशिक्षण संपन्न

वणी : 

श्री आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नोंदणी क्र. 140) वणी येथे संस्थेची तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवार, दि. 30 मे 2026 रोजी *"आर्थिक नियोजन"* या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी सहकारी वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने आयोजित या प्रशिक्षणास संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षणादरम्यान संस्थेची तसेच सभासदांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम व बळकट कशी करता येईल, आर्थिक व्यवस्थापनातील आवश्यक बाबी, बचत व गुंतवणूक नियोजन तसेच सहकार क्षेत्रातील बदलत्या आर्थिक आव्हानांना कसे सामोरे जावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी *आर्थिक सल्लागार मा. श्री. अनिकेत दीपक मोहितकर (IIM अहमदाबाद)* यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून आपल्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून कर्मचाऱ्यांना आर्थिक शिस्त, नियोजन आणि संस्थेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहिती दिली.
कार्यक्रमाला संस्थेचे *अध्यक्ष डॉ. स्वप्निल गोहोकार, उपाध्यक्ष श्री. संदीप गोहोकार, व्यवस्थापक श्री. कुणाल नागमोते* यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी, दैनिकांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडून संस्थेच्या भावी आर्थिक वाटचालीस नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post