वणीत वरली मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोन जण ताब्यात, ज्योती बार परिसरात छापा; नगदीसह जुगार साहित्य जप्त

वणी / प्रतिनिधी :

वणी शहरातील ज्योती बारच्या बोळीत सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:०५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख इरफान शेख रज्जाक (वय ४२) व शेख फारूख शेख सलिम (वय ३६, दोन्ही रा. पंचशील नगर, वणी) हे ज्योती बार परिसरात लोकांकडून पैसे घेऊन वरली मटक्याचे आकडे लिहीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले.
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडून नगदी ९६० रुपये, तसेच ०१ ते १० आकडे लिहिलेल्या मटका चिठ्ठ्या, कार्बन तुकडा आणि बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) तसेच बीएनएस कलम ४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही फिर्याद पोलीस उपनिरीक्षक शुभम मारोती महानवर (पो.स्टे. वणी) यांच्या तर्फे दाखल करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post