जैन महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित, अध्यक्षपदी नंदा भंडारी तर उपाध्यक्षपदी किरण डुंगरवाल


वणी /

शहरातील जैन महिला मंडळाची २०२६- २०२७ करिता नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सौ.नंदा अशोक भंडारी, उपाध्यक्षपदी श्रीमती किरण प्रेमचंद डुंगरवाल, सचिवपदी सौ. विद्या नितीन मुथा तर कोषाध्यक्षपदी सौ. अंशुमा अनिल झाबक यांची निवड करण्यात आली तर श्रीमती चंद्रकला बाई मुथा, सौ. कल्पना दिपक छाजेड, सौ. ममता कस्तुर सांड, सौ.वर्षा पंकज भंडारी, सौ. वंदना राहुल भंडारी, सौ.प्रियंका निलेश लोढा, सौ. वृशाली विशाल हिरण यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post