वणीत ४ जानेवारी ला 'महाएल्गार' शेतकरी मेळाव्याचे आयोजन, सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे पत्रकार परिषदेतून आवाहन

वणी :

नागपूर येथील महाएल्गार शेतकरी मोर्चाच्या यशस्वीत्तेनंतर शेतकरी वर्गात नवचैतन्याची लाट निर्माण झाली असून वणी येथील काही उत्साहित शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहार संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येवून, 'महाएल्गार शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या भेळाव्याला महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून, बडधाईस आलेली शेतीव्यवस्था व राजकारण या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा करून आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्याबाबत पाऊल उचलण्यात येईल असे पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला शेतकरी नेते, प्रहार संघटनेचे नेते व किसान सभेचे नेते उपस्थित होते.
या ऐतिहासीक मेळाव्याला माजी मंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते, वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉ. अजित नवले, माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेतेः रविकांत तुपकर, महादेव जानकर, राजन क्षिरसागर, शेतकरी नेते रघुनाथदादा चशिल यांच्यासह विविध सामाजिक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्ये वणी येथील शासकिय मैदान येथे उपस्थित राहणार असल्याने, कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव, कृषिपंप विज पुरवठा, पिक विमा, विज-धरण, शेतकरी आत्महत्यासह, शिक्षण व्यवस्था, वाहतूक धोरण, नैसर्गिक आपत्ती, फेर पिक पद्धती आदी विषयावर देखील सखोल चर्चा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
हा 'महाएल्गार' शेतकरी मेळावा, दि. ४ जाने २०२६ ला दुपारी १२.०० वाजता वणी येथील शासकिय मैदान (पाण्याच्या टाकीजवळ घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्यामूळे, शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
मागील काही वर्षांपासून शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामूळे, थकीत असलेले कर्ज, या वर्षी अतिवृष्टिमुळे पिकात आलेली घट, आणि शासकिय स्तरावरून अपेक्षीत असलेले आर्थिक सहकार्य न मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या मनातील उद्रेक या महाएल्गार शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने चव्हाट्यावर येणार आहे. महाराष्ट्रातील विवीध क्षेत्रातील, सामाजीक संघटनांचे दिग्गज येते, एका व्यासपीठावर येत असल्यामूळे, हा मेळावा ऐतिहासीक ठरणार आहे. 
या महाएल्गार शेतकरी मेळावा आयोजन समितीच्या वतीने, असे आवाहन करण्यात आले आहे की, वणी तालुक्यातील शेतकरी, तसेच झरी, मारेगाव, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजूरा, कोरपना तालूक्यातील शेतकरी, तथा जनसामान्य नागरिकांनी प्रचंड संख्येने, उपास्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा. अशी माहिती आयोजन समितीचे श्री. सतिश देरकर, कॉ. अनिल घाटे, देवरावजी पा. धांडे, दशरथ पाटील, मोबिनभाई शेख, रघुविर कारेकर, सय्यद अहमद, अनिल गोवारदिपे, कॉ. उल्माले सर, यांनी, शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेतून कळविले आले.

Post a Comment

Previous Post Next Post