वणी /
शहरातील टागौर चौकातील ट्युबवेल बंद पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. बंद पडलेली ट्युबवेल दुरुस्ती करून पाणी मिळावे अशी मागणी प्रभाग क्रमांक १० व ११ मधिल नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांच्याकडे दिनांक १२ डिसेंबर ला देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात आधीच पाच दिवसांआड नळाच्या पाण्याचा पाणी पुरवठा होतो आहे आणि त्यातही ते अशुद्ध पाणी असून पिण्यासाठी अयोग्य आहे. त्यामुळे टागोर चौक येथील ट्युबवेल लवकरात लवकर दुरुस्त करावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी सौ. मंदा बांगडे, मनोज शतपलवार, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, स्मिता नांदेकर, भावना लाल, रेखा मोहितकर, रंजना उइके, ऋती येरकाडे, सुनिता चटप यांच्यासह सौ शालु बुरडकर, कविता पचारे, रत्नाताई अंड्रस्कर, सोनु सोनेकर, सोनु नागपुरे, साहिल नालमवार, आकाश आगबत्तलवार, संजय नालमवार, सविता गौरकार, रोहिणी लोणकर यांच्यासह प्रभाग क्रमांक १० व ११ मधिल शंभर च्या वर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.