ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कुल वणी येथे विज्ञान प्रदर्शनी(Science Fair-2025), विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

वणी /

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कुल च्या छोरिया ले आऊट गणेशपुर, वणी (Black Diamond International School) येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना अधिक दृढ व्हाव्यात यासाठी 21 जानेवारी ला विज्ञान प्रदर्शन (BDIS Science Fair 2025 ) आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ब्रीजमोहन वर्मा HR Head RCCPL Mukutban यांनी रिबीन कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कुल चे कार्यकारी संचालक तथा मा. सभापती पं.स. वणी संजय पिंपळशेंडे व प्रमुख अतिथी म्हणुन मिथिलेश कुमार Technical head RCCPL Mukutban.,गजानन कासावर सर सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ,प्रा. महादेवराव खाडे सर अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद ,मंजुषा पिंपळशेंडे संचालिका, प्राचार्या अश्विनी ढोले ,उपप्राचार्या पुजा जोबनपुत्रा , सोहेल पटेल सर, पुर्व प्राथमिक समन्वयिका मृणाली दंतुलवार, अविनाश लेनगुरे सर, पोर्णिमा खिरटकर मॅम, पल्लवी जेणेकर मॅम, अस्मा मॅम , दिपक रासेकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाळेतील std 1st to std. 7th च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग सादर केले होते त्यांची पाहणी करून सर्वांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.
  या कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.ते बोलतांना Innovation at early age with artificial Intelligence , Machine learning & Robotics या नाविन्यपूर्ण विषयावर भर दिला .

या विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांच्या वेशभुषेसह अनेक प्रोजेक्ट प्रात्यक्षिके सादर केली होती. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या Science Fair-2025 मधे सहाव्या वर्गातील विद्यार्थिनी हिफ्जा खान हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक इशीता जैन , तृतीय क्रमांक तिथी अंड्रस्कर प्रोत्सानपर पारितोषिक डिंपल भोंगळे व सुरभी कहारे यांना मिळाला यांचेसोबतच पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकाच्या वेशभूषेतील स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राकुल पांडे, द्वितीय क्रमांक रिया शर्मा , तृतीय क्रमांक गौरी , प्रोत्त्सानपर पारितोषिक जान्हवी कोहली यांनी पटकविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन भुजाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षिका, पालक, कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post