वणी :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विभाग अलर्ट आहे. असे असताना मात्र वणी परिसरातुन शहरात रात्रीच्या अंधारात अवैध रेती वाहतूक होत आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.
एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे.
अशी व्यवस्था असताना मात्र या आचारसंहिता काळात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणी परीसरात अनेक नदी नाले ओढे आहेत ज्या मधुन रात्रीच्या अंधारात अवैध रेती वाहतूक केली जाते, शिंदोला, अहेरी बोरगाव परीसरातुन रात्रीच्या अंधारात रेती वाहतूक केली जाते असल्याची खात्रीलायक वृत्त आहे सदर रेती ही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वणी शहरात पोहोचले जात आहे. मात्र गस्ती पथकाला अवैध रेती वाहतूक करणारे वाहन का दिसत नाही! हे एक कोडेच आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आहे.