'वारली' चित्रकलेच्या माध्यमातून 'मतदान करा' जनजागृती मोहिम, खाकी वर्दी तील कलावंत शेखर वांढरे यांचा उपक्रम...

वणी :

वारली चित्रकार व यवतमाळ पोलीस , वणी पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेले सहा.पोलीस अधिकारी शेखर वांढरे यांनी वारली चित्रकलेच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. 
   दि.२०/११/२०२४ रोजी विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी वारली चित्रकलेच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम दि.१०/११/२०२४ ते २०/११/२०२४ पर्यंत ते राबविणार आहे. त्यांनी पाठवीलेले वारली चित्रकले मधुन 'मतदान करा' हा संदेश आपल्या अनेक मित्रांना पाठवा व मतदान जनजागृती मध्ये सामील व्हा, असे आवाहन , शेखर वांढरे (वारली चित्रकार)
यवतमाळ पोलीस यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post