पत्रकार रवि ढुमणे यांची गळफास घेऊन आत्महत्या

वणी/ 

 वणी परिसरात सुपरिचित असलेले पत्रकार
रवि ढुमणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी १५ डिसेंबर ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. 
रवि ढुमणे हे मुळचे वणी शहरानजीक असलेल्या चिखलगाव येथील रहिवासी होते. ते सध्या वणीतील नांदेपेरा बायपास रोडवरील विद्या नगरी चामाटे ले आऊट येथे कुटुबीयांसह राहत होते. सकाळी चहा देण्यासाठी कुटुंबीय गेले असता त्यांनी आतून दार उघडले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी खोलीत जाऊन बघितले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी घराच्या खिडकीच्या गजाला दोर बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. रवी ढुमने हे अभ्यासू आणि धाडसी व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे आत्महत्या सारखें टोकाचं पाऊल त्यांनी का उचलले? याचे कारण सध्यातरी कळू शकले नाही. मात्र काही कारणास्तव ते काही काळापासून नैराश्यात होते, असे त्यांचे परिचित सांगत आहेत.
 रवी ढुमने यांच्या आत्महत्येची बातमी शहरात कळताच हळहळ व्यक्त होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्याबाबत सहवेदना व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलं, सुन असा मोठा आप्त परिवार आहे.

(रवि ढुमणे यांना स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!)

Post a Comment

Previous Post Next Post