वणी /
निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांचा ६९ वा स्म्रुतिदीन, त्या निमित्ताने शुक्रवारी रात्री नगर सेवा समितीच्या वतीने शहरातील विविध भागात
थंडीमध्ये कुडकुडत असलेल्या गरजवंतांना थंडीपासून बचाव करण्यासाठी मायची ऊब देण्यासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
बस स्टँड , रेल्वे स्टेशन, ग्रामीण रुग्णालय परिसरात, व रस्त्यांच्या कडेला झोपलेल्या लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवां समितीचे अध्यक्ष नामदेवराव शेलवडे, दिनकरराव ढवस, राजु तूराणकर, नितिन बिहारी, स्माईल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, अरविंद भाऊ कापसे, अमोल मोहितकर, नरेंद्र क्षिरसागर, भास्कर पत्रकार, बाळू तुरणकर, अनुराग तुरणकर, स्वप्निल बिहारी, ओम क्षिरसागर, विकास जयपुरकर, कार्तिक तुरणकर इत्यादींनी सहकार्य केले.