वणी /
इंडियन मेडिकल असोसिएशन वणी व सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल प्रा.लि. चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वणी येथे विविध रुग्णालयातील आरोग्य सेवक व सेविका यांचे करिता बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत श्री.निशांत सोनटक्के व श्रीमती विथीका वैद्य यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर सर्वांना ईत्यंभुत माहिती दिली. तसेच उत्स्फूर्तपणे सर्वांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला आयएमएचे पदाधिकारी तसेच होमिओपॅथी असोसिएशन व आयुर्वेदिक असोसिएशन चे सर्व डॉक्टर मंडळी उपस्थित होते. आयोजित या कार्यशाळेला जवळपास 80 ते 90 स्टाफ नर्सेस हॉस्पिटल कर्मचारी व डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन वणीचे डॉ. शिरीष कुमारभार, डॉ. सुनील जुमनाके, डॉ.संकेत अलोणे, डॉ. स्वप्नील गोहोकार यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.