वणी /
शहरातील एकमेव व ८०० वर्षे पुरातन असलेले नृसिंह मंदिरात दिनांक ११ मे रोज रविवारी नृसिंह जयंती निमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.
सकाळी जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को आप.सो.लि.चे अध्यक्ष श्री. संजय खाडे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली.
दुपारी ह.भ.प. मुन्ना महाराज तुगणायात यांचे कीर्तन, सायंकाळी श्री. विजयबाबु चोरडिया आणि श्री. नितीन मृत्यलवार मुख्य अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर यांचे हस्थे महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगन दर्शनासाठी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकारिता नृसिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष घनश्याम ठाकूर, उपाध्यक्ष राजाभाऊ पाथरडकर ,सचिव माधव केदार, किशन इशपून्यांनी, दिलीप सुरावर, बंकाजी, रवी आमटे, जयंत लीडबीडे, सुनील येमुलवार, गिरीश एरोजवार यांनी परिश्रम घेतले.