वणी :-
शहरातील रंगनाथ नगर (शक्तिशाली नगर) प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी व नगर परिषदेचे माजी सभापती संतोष पारखी यांची अखेर भाजपात घरवापसी झाली आहे.
गुरुवारी सकाळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवासस्थानी माजी नगरसेवक राकेश बुग्गेवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपातुन नगरसेवक म्हणुन निवडून आलेले प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक संतोष पारखी यांनी आपल्या नगरसेवक पदाची कमान पालिकेत रोवली होती. दरम्यान त्यात त्यांनी पाणी पुरवठा सभापती पदाची देखिल सूत्रे सांभाळली. परंतु कालांतराने ते काँग्रेस च्या वाटेवर लागले आणि त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना संतोष पारखी यांनी आणखी "बॅक टू पवेलिअन" होत त्यांनी भाजपात घर वापसी केल्याने आमदार बोदकुरवार यांना याचा नक्की फायदा होणार असे चित्र दिसत आहे.
शहरातील रंगनाथ नगर, शास्त्री नगर, रामपुरा वार्ड, खरबडा मोहल्ला हा भाग कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र संतोष पारखी यांच्या प्रवेशाने या प्रभाग क्रमांक १२ मध्ये मतांचे समीकरण बिघडणार असल्याचे बोलले जात असुन याचा फायदा मात्र बोदकुरवारांना होणार असल्याचे संकेत दिसत आहे.