शिरपूर येथे जागतिक महिला दिन थाटात साजरा, १२ मार्च रोजी महिलांनी केले कलेचे सादरीकरण

वणी :

महिलांना समान हक्क, समान संधी व समान वेतन मिळावे यासाठी जगभरात झालेल्या संघर्षातून महिलांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. महिलांची भूमिका केवळ चूल आणि मूल इतकीच मर्यादित नसून त्या समाजाच्या सर्व क्षेत्रात पुरुषांइतक्याच सक्षम आहेत, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जातो.
याच अनुषंगाने शिरपूर येथेही महिलांनी एकत्र येत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. दिनांक १२ मार्च रोजी शिरपूर ग्रामपंचायतीच्या पटांगणावर हा कार्यक्रम सुवर्णा बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व किरण देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाला ज्योत्स्ना रामटेके, वेणु झोडे, सुरेखा ढेंगळे, सरपंच गणेश डाहुले, उपसरपंच मोहित चचडा तसेच तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद मंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात गावातील महिला व मुलींनी नाटिका, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच महिला दिनानिमित्त किरण देरकर, सुवर्णा बोंडे व अन्य मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमती बोधे यांनी केले. सूत्रसंचालन आशू मत्ते यांनी केले तर आभार सोनू रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमाला मनीषा ठमके, मयुरी बोधे, कोमल ठावरी, मनीषा बोधे, नंदा डवरे, लता फेथफुलवार, लता गोरे, शांताबाई सलाम, कांचन ठाकरे, ज्योती खोबरे, संगीता ननकटे, वृंदा मंदे, माधुरी मंदे, प्रेमाली निकोडे, शितल गोरे, अर्चना ननकाटे, ललिता सिडाम, जया खोबरे, काजल गणवीर आदींसह गावातील अनेक महिलांची उपस्थिती होती.
त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडून यशस्वी ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post