भुरकी रेती घाटातून घरकुलधारकांना रेती वाटप सुरू

वणी प्रतिनिधी :

वणी तालुक्यातील भुरकी येथील रेती घाटातून घरकुलधारकांना रेतीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भुरकी गावच्या सरपंच सौ. सीमा बदकी, तलाठी शेख, घाटधारक महादेव पानघाटे, प्रवीण झाडे यांच्यासह अतुल हिवरकर, सूर्यकांत मोरे, धर्मा काकडे, सुमित ठेंगणे, मनोज मिलमिले, अतुल बोबडे, प्रमोद मिलमिले, गुलशन खुराणा, भोला चिकनकर, धीरज पेचे तसेच भुरकी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या भुरकी येथील आनंदराव लांबट, साईनाथ लांबट व इतर घरकुलधारकांना नियमानुसार रेतीचे वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे घरकुलधारकांना घरबांधणीसाठी मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post