बालाजी महाराज मंदिर, सालासर (राजस्थान) संस्थेतर्फे विजय चोरडिया यांचा सन्मान

वणी / 

गेल्या सात दिवसांपासून विविध राज्यातील तिर्थस्थळावर दर्शनाकरीता विजय चोरडिया सहकुटुंब मित्र परिवारासह निघालेले असून बुधवारी सालासर (राजस्थान) येथील प्रसिद्ध मंदिर बालाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिराचै विश्वस्त राहुल पंडितजी यांनी विजय चोरडिया यांना बालाजीची प्रतीमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी सौ.सीमा विजय चोरडिया, महावीर कटारीया, सौ कटारीया व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, परशुराम पोटे, संदिप बेसरकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बन्सोड, रवि रिंगोले, चालक प्रमोद उरकुडे,  फैजल शेख, प्रमोद उरकुडे उपस्थित होते.
वणी शहरातील भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया हे सहकुटुंब मित्र परिवारासह विविध राज्यातील तिर्थक्षेत्राच्या दर्शनाकरीता निघालेले आहेत. 
शुक्रवारी दुपारी वणी वरुन निघालेले हे तीर्थकरु शनिवारी दुपारी तीन वाजता उत्तर प्रदेश येथील प्रयाग राज महाकुंभ मेळाव्यात पोहोचले तिथे पवित्र स्नान करून रविवारी श्री राम जन्मभूमी अयोध्या येथिल श्री राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले त्यानंतर सोमवारी वृंदावन, मथुरा येथील श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि रात्री अडीच वाजता युगपुरुष प्रेमानंद महाराज यांचे प्रत्यक्षात दर्शन घेतले आणि पुढील तीर्थयात्रेकरिता बुधवारी राजस्थान येथे पोहोचले. राजस्थान येथील खाटु श्याम मंदिर, श्री सच्चियाय माताजी मंदिर ओसिया , श्री बालाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी बालाजी महाराज मंदिर समितीचे विस्वस्त राहुल पंडित यांनी सामाजिक कार्यकर्ते विजय बाबु चोरडिया यांचा महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. त्यानंतर रात्री ११ वाजता जोधपूर शहरात दाखल , रात्री मुक्काम आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता उज्जन करिता रवाना झाले असून तिथे महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन केल्यानंतर वणीकडे प्रस्थान केले जाईल अशी माहिती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post