डोक्यावर २५१ किलो वजनाचा त्रिशूल आणि यात्रा पोहोचली शिरपूर गडावर

वणी /

 महाशिवरात्री निमित्त बुधवारी त्रिशूळ यात्रा वणी शहरातून निघाली आणि शिरपूर गडावरील महादेव मंदिरात पोहचली.
वणी -कोरपना मार्गांवरील शिरपूर येथील शिवगडवर महादेव मंदिर आहे त्या मंदिर परिसरात महाशिवरात्री ला भव्य जत्रा भरते या जत्रेत परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
  २५१ किलो वजनाचा त्रिशूळ शिवभक्तांनी डोक्यावर घेऊन बुधवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून शिरपूर गडापर्यंत पायदळ १५ किलोमीटर चे अंतर पार केले.
वणी चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंन्द बोर्डे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी त्रिशूळ यात्रा काढण्यात येते. या त्रिशूळ यात्रेत शहरातील व परिसरातील हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. बसस्थानका जवळील हनुमान मंदिर येथून सकाळी १० वाजता या पदयात्रेला सुरूवात झाली.
त्रिशूळ यात्रा यशस्वीतेसाठी ऍड कुणाल विजय चोरडिया, प्रशांत भालेराव, अनिल अक्केवार, निखिल खाडे, मंगेश झाडे, निलेश परगंटीवार, सुरेश आवारी, संतोष लक्षेट्टिवार, गजानन कासावार, सारंग बिहारी, व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post