एस.पी.एम. विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार यश

वणी /

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळावे या उद्देशाने घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत एस.पी.एम. विद्यालयातील तीन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कु. पालवी पंकजराव कऱ्हाड, कु. आरुषी महादेव सोनटक्के आणि कु. रिधिमा गजानन अलोने या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा उमटला आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकवृंद व पालकांना दिले आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयभाऊ मुकेवार, उपाध्यक्ष श्री. नरेंद्रजी बरडिया, सचिव श्री. सु. धो. देशमुख, सहसचिव श्री. अशोकजी सोनटक्के तसेच मंडळाचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद क्षीरसागर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post